अमळनेर : तालुक्यातील अंबारे येथील रहिवासी तथा मालेगाव तालुक्यातील के. बी. एच. विदयालय, मालेगाव कॅम्प, ता. मालेगाव. येथे कार्यरत असलेले उपशिक्षक उमेश जयराम पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची राज्यशास्त्र विषयातील पीएच.डी.पदवी विद्यापीठाचे उप कुलगुरू एस. टी. इंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्यांच्या संशोधनाचा विषय - 'कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या राजकीय,शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील योगदानाचा विशेषणात्मक अभ्यास' असा होता.त्यांना डॉ. संभाजी संतोष पाटील,एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालय,धुळे यांनी मार्गदर्शन केले. ते जे.डी.सी.सी. बँक कर्मचारी जे.के. पाटील अंबारे यांचे सुपुत्र असून त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षण क्षेत्रातील सहकारी, मित्रपरिवार व परिसरातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या