अमळनेर : शिवाजी नगर परिसरात मुंदडा परिवाराने स्व.शिरीष मुंदडा यांच्या स्मरणार्थ अभ्यास केंद्र बांधण्यात आले. या भागात ४ जानेवारी २५ ते ११ पर्यंत किर्तन सप्ताहाचे आयोजन केले होते.
शनिवारी ११ रोजी काल्याचे किर्तन होते त्या प्रसंगी मुंदडा परिवाराने स्वर्गिय शिरिष भाऊ मुंदडा यांच्या स्मरणार्थ बांधुन दिलेल्या भव्य वाचनालयाचे ऊदघाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री माननिय आमदार अनिल पाटील व अमळनेर नगरीचे माजी नगराध्यक्ष गोविंद मुंदडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रकाश मुंदडा, योगेश मुंदडा व अमेय मुंदडा यांनी सांगितले कि शिरिष भाऊंची आठवण कायम स्वरुपी रहावी व आपल्या या ऊपक्रमातुन अमळनेर मधिल भावी पिढी निर्माण व्हावी व गरजु व होतकरु विद्यार्थ्यान्ना अभ्यास करण्यासाठी दालन ऊपलब्ध करुन द्यावे, समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या साठी मुंदडा परिवाने ही संकल्पना केली होती व आज खरोखर आनंद होत आहे की यातुन भावी पिढीचे ऊज्वल भविष्य निर्माण होणार आहे. त्या साठी अजुन ही काही मदत व सहकार्य लागेल तर ते ही करु आणि भावी पिढीतुन जे होतकरु विद्यार्थी असतील ते घडवु.
शिवाजी नगर परिसरात आयोजित केलेल्या या किर्तन सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या साठी अन्नदानाच्या स्वरुपात समाजातील बर्याच दात्यानी सढळ हाताने मदत केली व हा कार्यक्रम यशस्वी करण्यास हातभार लावला.
सदरील कार्यक्रमासाठी नगरसेवक प्रताप शिंपी, अरुण पाटील, जीवन पवार, गिरीश पाटील, सागर शिंपी, बबलू पाटील, विकी पाटील, मधु चौधरी, राजू पाटील, छोटू चौधरी, पवन चौधरी, दीपक चौधरी, सुनील पाटील, दीपक पाटील कैलास पाटील बंटी चौधरी सुनील पाटील गणेश भोई गणेश पाटील लहु आबा, कैलास बडगुजर, तसेच राजे शिवाजी मित्र मंडळातील सर्व कार्यकर्त्यान्नी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन अरुण पाटील यानी तर आभार प्रदर्शन लहु पाटील यानी केले. कार्यक्रमास सभापती अशोक पाटील, राजू महाले, भिला पाटील, प्रल्हाद पाटील, विष्णू पाटील, नीरज अग्रवाल, ज्ञानेश्वर पाटील, बंडू जैन, प्रितेश जैन ऊपस्थित होती.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या