अमळनेर प्रतिनिधी :येथील शांतिनिकेतन प्राथमिक व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीला संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य रावसाहेब के डी पाटील, संचालिका प्रा.डॉ नयना पाटील मॅडम यांच्या हस्ते आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चेअरमन नानासाहेब डी.डी पाटील होते. याप्रसंगी बापूसो एन.डी पाटील उपस्थित होते.
यावेळी शांतीनिकेतन प्राथमिक व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींनी विविध खाद्यपदार्थ बनवून खाद्यपदार्थांचे स्टॉल सजवले होते. सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्टॉलवर खाद्यपदार्थ विकत घेत आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध वस्तूंची विक्री केली. त्यांना विविध वस्तू कशा बनतात, ते बनवण्याचे ज्ञान प्राप्त झाले. बाल आनंद मेळावा हा बालकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतो. बाल आनंद मेळाव्यामुळे बालकांना स्वतः पाककृतीचे प्रात्यक्षिक करायला मिळाले.
यावेळी सीनियर आणि ज्युनियर कॉलेजचे, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक , शिक्षिका वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या