Type Here to Get Search Results !

Banner

स्पर्धा परीक्षेत सातत्य महत्वाचे श्री.अंकुश देशमुख यांचे प्रतिपादन


अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA), अंतर्गत गुणवत्ता अभिवचन कक्ष (IQAC),आणि करियर कौन्सिलिंग सेंटर (CCMC)यांच्या संयुक्त विद्यमाने 15 दिवशीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्सचे उद्घाटन आज पूज्य साने गुरुजी सभागृहात सकाळी 10:30 वाजता संपन्न झाले. यावेळी युनिक अकॅडमी,पुणे यांच्या माध्यमातून 15 दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्स आयोजित केले आहे.
 दि.16 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या दरम्यान संघ लोकसेवा आयोग(UPSC),महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC),कँबाईड परीक्षा,बँकिंग परीक्षा,रेल्वे परीक्षा, पोलीस भरती,UPSC सिसॅट याच प्रमाणे यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेतील विविध टप्पे,मुख्य परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम यांची तयारी करून घेण्याच्या दृष्टीने पंधरा दिवशीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कोर्स उपयुक्त असणार आहे.सदर कोर्सचे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष तथा प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी केले. सुरुवातीस पूज्य साने गुरुजी, माता सरस्वती देवी,कर्मयोगी-कर्मयोगी-श्रीमंत- दानशूर प्रताप शेठजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विचार मंचावर युनिक अकॅडमीचे मार्गदर्शक श्री अंकुश देशमुख,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.बी.जैन, उपप्राचार्य डॉ.अमित पाटील, कोर्सचे समन्वयक डॉ.जे.बी.पाटील, करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, युनिक अकॅडमीचे माननीय नरेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगीआपल्या अध्यक्षीय व उद्घाटन पर भाषणात प्राचार्य यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की,यूपीएससी ही परीक्षा कठीण असली तरी नियोजनबद्ध अभ्यासातून आपण यूपीएससी परीक्षांना सामोरे गेले पाहिजे.या परीक्षांचे अभ्यास करताना अभ्यासक्रम डोळ्यापुढे ठेवून विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घ्यावे आणि उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करण्याची संधी उपलब्ध करून घ्यावी यासाठी सर्व विद्यार्थ्यांना माननीय प्राचार्यांनी शुभेच्छा दिल्या.प्रताप कॉलेज विद्यार्थी घडविण्याचे केंद्र आहे.
  यावेळी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन इतिहास विषयाचे प्रमुख डॉ. धनंजय चौधरी यांनी केले. प्रमुख अतिथींचा परिचय समन्वयक डॉ. जे.बी पाटील यांनी करून दिले तर उद्घाटन पर समारंभाचे आभार डॉ. बालाजी कांबळे यांनी मानले.
पहिले सत्र हे युनिक अकॅडमीचे श्री.अंकुश देशमुख यांनी घेतले.यावेळी अंकुश देशमुख यांनी आपल्या दोन सेशनमध्ये अर्थात,साडेदहा ते दीड आणि दीड ते साडेतीन या दरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालय जीवनातील वर्ष वाया जाणार नाहीत याची काळजी सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन केले.स्पर्धा परीक्षा कठीण असले तरी त्यात सातत्य ठेवणे हे यशाचे गमक आहे, असे सांगताना त्यांनी दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी चार सेशनमध्ये यूपीएससी रचना स्वरूप व अभ्यासक्रम यासंदर्भात सूक्ष्मतवाने मांडणी करून विद्यार्थ्यांनी नेमके काय वाचावे ? कशाचा अभ्यास करावा ? भाषा कशी अवगत करावी ? याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले.यावेळी सभागृहात करिअर कौन्सिलिंग सेंटरचे सन्माननीय सदस्य डॉ.आर सी सरवदे, डॉ रवी बाळसकर,प्रा. विजय साळुंखे,डॉ. माधव भुसनर, डॉ.राखी घरटे, डॉ.प्रदीप पवार, प्रा. दिलीप तडवी,प्रा. कोकणी प्रा. हिमांशी गोसावी,प्रा.अमोल अहिरे यांनी विशेष असे परिसर घेतले.
 यावेळी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे श्री दिलीप शिरसाट, श्री पराग पाटील, श्री विशाल आहीरे, अतुल राजपूत यांनी सहकार्य केले.यावेळी विविध विद्याशाखेचे 200 विद्यार्थी उपस्थित होते.या वेळी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी युनिक अकॅडेमीने स्टडी मटेरियल दिले.सदर उपक्रमास खानदेश शिक्षण मंडळाचे सह चिटणीस डॉ.धिरज वैष्णव, रुसाचे समन्वयक डॉ.मुकेश भोळे,डॉ.अमित पाटील यांनी सुद्धा सहकार्य केले.
पहिल्या दिवशीच्या मार्गदर्शन अभ्यास कोर्सचे आभार समन्वयक डॉ.जितेंद्र पाटील यांनी मानले.

----------------------------------------------------
●रुसा, अंतर्गत गुणवत्ता अभिवचन  
  कक्ष,सीसीएमसी विभाग यांचा संयुक्त उपक्रम
● प्रतापचा विद्यार्थी यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण
   व्हावे-प्राचार्य डॉ.ए बी जैन यांची मनीषा
● युनिक अकॅडेमीचे मार्गदर्शन
● निःशुल्क मार्गदर्शन वर्ग
-----------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या