पारोळा: दि 29 डिसेंबर रोजी जळगांव जिल्हा सेवा निवृत्त संघ शाखा पारोळाची वार्षीक सर्वसाधरण सभा भूमीका नगर पारोळा येथे नुतन वास्तुत घेण्यात आली सभेचे अध्यक्ष स्थान श्री सोनवणे दादा जिल्हा अध्यक्ष जळगांव यांनी भूषविले सभेत वर्षभराचा लेखा जोगा वाचून विषय क्र1 ते 9 सर्वानुमते मंजूर करण्यात आले सभेस जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शक करून विविध विषयावर सखोल चर्चा करून सभा उत्साहात पार पडली आणि सन 2024 ते सन 2027 ची कार्यकारीणी श्री हिम्मतराव पाटील दादा निरीक्षक यांनी जाहीर केली त्यामध्ये अध्यक्षपदी श्री गंजीघर शिवराम पाटील सरचिटणीस श्री बारकू तानीराम पाटील , उपाध्याक्ष पदी श्री रंगराव पंडीतराव पाटील, पुंडलीक दौतल पाटील कोषाध्यक्षपदी श्री पंतगराव वना पाटील, कार्याध्यपरी श्री गुणवंतराव शिवदास पाटील आणि सर्व कार्यकारीणी जाहीर करण्यात आली सुत्र संचलन पंतगराव पाटील यांनी केले आभार प्रदर्शन श्री गुणवंतराव पाटील यांनी केले सर्व मंडळींनी भोजनाचा अस्वाद घेवून सभा उत्साहात पार पडली.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या