अमळनेर: दि 24 जानेवारी 2025 रोजी अमळनेर येथील लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालय अमळनेर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाचा पहिल्या पुष्पात विद्यार्थ्यांना विविध क्रीडा स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नवीन मराठी शाळेचे चेअरमन प्रा.आर.पी नवसारीकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर मा.सुधीर श्रावण चौधरी व त्यांच्या सुविद्य पत्नी भावना सुधीर चौधरी आणि श्रद्धा क्लासेसचे संचालक-संचालिका मा.शेखर रामचंद्र कुलकर्णी व त्यांच्या सुविद्य पत्नी शारदा शेखर कुलकर्णी हे होते.
स्नेहसंमेलनाचा दुसर्या पुष्पात विद्यार्थ्यांसाठी असलेला रंगारंग कार्यक्रम घेण्यात आला यात विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार सादर केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालविकास मंदिराचे चेअरमन वसंत राजधर पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे मोरया हाॅस्पिटलचे संचालक डाॅ.दिनेश चंद्रकांत महाजन व त्यांच्या सुविद्य पत्नी डाॅ.अश्विनी दिनेश महाजन होते. तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.धर्मसिंह धनसिंह पाटील, चिटणीस विवेकानंद लक्ष्मण भांडारकर, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.प्रभाकर जगन्नाथ जोशी, नवीन मराठी शाळेचे चेअरमन प्रा.आर.पी नवसारीकर लोकमान्य विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर महाजन, नवीन मराठी शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र मोरे, बालविकास मंदिराचे मुख्याध्यापक अनिता वैद्य आदी मंचावर विराजमान होते. यावेळी तिनही शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकमान्य विद्यालयाचे जेष्ठ शिक्षिका मनिषा खांजोडकर, जेष्ठ शिक्षक जितेंद्र चौधरी, उपशिक्षक मधुकर सोनार, आशा सोनवणे, रेखा कांबळे, संदिप महाजन यांनी केले तर जेष्ठ शिक्षिका सायली देशपांडे व भूषण महाले यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या