Type Here to Get Search Results !

Banner

साळव्यात प्रजासत्ताक दिवस वाजत, गाजत, नाचत, साजत उत्साहात संपन्न

 
रंग, रूप, भाषा, प्रांत जरी अनेक असले तरी भारतीय एक आहे ती ताकद आहे संविधानाची- मुख्याध्यापक एस डी मोरे 

     धरणगाव प्रतिनिधी 

       साळवे तालुका धरणगाव येथील इंग्रजी विद्यालय, पूज्य साने गुरुजी प्राथमिक सेमी विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची व मुलींची शाळा आणि आणि ग्रामपंचायत साळवे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीचे शासकीय ध्वजारोहण झेंडा चौकात सरपंच आशाताई कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून विकास सोसायटीचे ध्वजारोहण करण्यात आले. नंतर झेंडा चौकात लेझीम नृत्य, देशभक्तीपर गीते, ऐतिहासिक नाटिका व विविध गुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. काही विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर असे भावपूर्ण भाषणे दिले. अनेक पालकांनी त्यांचे कौतुक केले व शुभेच्छा देण्यासाठी रोख स्वरूपात खूप मोठ्या प्रमाणावर बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी मतदार नोंदणी अधिकारी म्हणून उत्कृष्ट काम करणाऱ्या श्री एस डी मोरे सर यांना प्रमाणपत्र देऊन सरपंच यांनी सत्कार केला. त्यानंतर विभागीय पातळीवर शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धेत रोप्य पदक मिळवणाऱ्या व्हीं एस कायदे सरांचा डॉ शशिकांत नारखेडे, स्कूल कमिटीचे चेअरमन यांच्या हस्ते सत्कार करुन प्रमाणपत्र देण्यात आले. राष्ट्रीय मतदान जागृती सप्ताह निमित्त रांगोळी व चित्रकला स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. मतदान जनजागृतीची शपथ घेण्यात आली. शेतकऱ्यांना ऍग्रीस्टॅक ची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे स्पर्श जनजागृती अभियान व कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.
    मुख्याध्यापकांनी सांगितले या दिवशी स्वतंत्र भारताची राज्यघटना लागू झाली व भारत हा सार्वभौम म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेणारे राज्य ठरले. लोकांना हक्क व कर्तव्याचे अधिकार मिळाले असे सांगितले.

        कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व्ही के मोरे यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी रंजना नेहेते, प्रतिभा पाटील, पौर्णिमा वारके यांनी करून घेतली. संचलन व प्रभात फेरीचे नियोजन क्रीडा शिक्षक बी आर बोरोले व व्हि एस कायंदे यांनी केले. बँड पथक एस पी तायडे व ए वाय शिंगाने व इतर शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी मदत केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या