Type Here to Get Search Results !

Banner

मुंदडा विद्यालयातील विद्यार्थ्याकडून कलागुणांचे दर्शन व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण

अमळनेर: श्री.नारायणदास तेजकरण मुंदडा विद्यामंदिर व स्व.श्री.मधुसूदन सुरजमल मुंदडा माध्यमिक विद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन 2025 उत्साहात पार पडले. मुंदडा फाउंडेशन चे अध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ मुंदडा व मुंदडा फाउंडेशनचे चिटणीस मा.श्री योगेशभाऊ मुंदडा यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ मुंदडा अध्यक्षस्थानी होते.
    विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात आपल्या कलाकुणांचे प्रदर्शन घडविले. राजमाता जिजाऊ यांची शौर्यगाथा, छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा, देशभक्तीपर गीते, नारीशक्ती, लावणी, व्यसनमुक्तीवर आधारित नाटिका, मोबाईलवर आधारित नाटिका, स्वच्छतेवरील नाटिका, समाजप्रबोधन पर नाटिका सादर केले. असे एकूण 35 बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.
   विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सादरीकरणाला पालकांसह विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, नाटिकेतील अभिनयामुळे उपस्थितांची मने जिंकली. मा.श्री विलास साळुंखे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर शाळेतील दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या 45 विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, मेडल, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच नोकरी मिळवून ड्युटीवर रुजु झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा देखील सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ मुंदडा व मा.श्री योगेशभाऊ मुंदडा यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्यातील कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होत असते. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास करून उज्वल यश संपादन करावे. विद्यार्थ्यांच्या सत्कारांमुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढत असल्याचे सांगितले. शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.
     या कार्यक्रमासाठी मा.मुख्याध्यापक श्री विंचुरकर सर, मा.मुख्याध्यापक श्री धनराज, महाजन सर, मा.मुख्याध्यापक श्री अविनाश पाटील सर, पर्यवेक्षक श्री डी.एन.पाटील सर, मा.श्री योगेश चौधरी सर, मा.श्री एच.एम.पाटील सर, मा.श्री बोरसे सर मा.श्री गोकुळ पाटील सर, मा.श्री दीपक पाटील सर, मा.श्री अनिल माळी सर, मा.श्री चेतन पाटील सर यांची उपस्थिती होती. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सौ.नेहा पाटील मॅडम यांनी केले.
      सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मा.श्रीमती भारती पाटील मॅडम व सुनिल पाटील सर यांनी केले. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या