Type Here to Get Search Results !

Banner

अर्जित रजा रोखीकरण संबंधित 4 मे 2022 आजचा शासन निर्णय!

दि. १ जानेवारी, २०१६ रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त/शासन सेवेत असताना निधन झालेल्या/ होणा-या तसेच वरील संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्र.२ (२) व परिच्छेद क्र.३ मध्ये नमूद केलेल्या प्रकरणी, खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ज्यांना अर्जित रजा देय आहे अशा कर्मचा-यांच्या अर्जित रजा रोखीकरणाच्या परिगणनेसाठी “वेतन” या संज्ञेचा अर्थ, हा उपरोक्त संदर्भ क्रमांक ६ येथील अधिसूचनेतील नियम क्रमांक ३ (१२) अन्वये अंमलात आलेल्या मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार राहील.

२. तसेच उपरोक्त नमूद परिच्छेद-२ मध्ये नमूद अर्जित रजा देय असलेल्या कर्मचा-यांचे बाबतीत सुधारित वेतन संरचनेतील वेतन विचारात घेऊन त्यांना नियमाप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या शिल्लक अर्जित रजेच्या
संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम, एका ठोक रकमेत रोखीने प्रदान करण्यात यावी. जर संबंधित कर्मचारी दिनांक १/१/२०१६ ते दि. ३१/१/२०१९ या कालावधीत असुधारीत वेतन संरचनेतील वेतनाच्या आधारे शिल्लक अर्जित रजेच्या रोख सममूल्याची रक्कम यापूर्वी अदा केलेली असल्यास, त्यांना या शासन
निर्णयाच्या अनुषंगाने फरकाची रक्कम ठोक रकमेद्वारे रोखीने प्रदान करण्यात यावी.

३. सदर शासन निर्णय वित्त विभाग, अनौपचारिक संदर्भ क्र.७६/२२/सेवा-६, दिनांक ०६/०४/२०२२ च्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या