Type Here to Get Search Results !

Banner

अदित्य ठाकरे यांची खोचक टीका ! (aditya thakarey)


 मुंबई: दक्षिण मुंबईत भाजपाचाच खासदार असणार. मुंबईत शिवसेनेचा एकही खासदार निवडून येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होत. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी राणेंच्या या विधानाला प्रत्युत्तर दिल आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत नारायण राणेच भाजपमध्ये राहतील की नाही हा प्रश्न आहे असा टोला माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी लगावला.

आमच्याबद्दल वाईट बोलायचं हा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. आमच्या मनात तरी असं काही नाही. अशा लोकांकडे कमीत कमी लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करु शकतो असं स्पाष्ट मत यावेळी आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. राणेंच्या विधानाबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले,”निवडणूक येईपर्यंत ते भाजपामध्ये राहतील का? हा त्यांचा चौथा पक्ष आहे. मी त्यांच्यावर जास्त बोलत नाही. कारण जेव्हापासून त्यांनी गद्दारी केली आणि पक्ष सोडून गेले तेव्हापासून ते आपल्या कामाबद्दल अजिबात बोललेले नाहीत, असा निशाणा आदित्य ठाकरेंनी यावेळी राणेंवर साधला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या