Type Here to Get Search Results !

Banner

आ.अनिल पाटील यांच्या हस्ते महत्वपूर्ण विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन!


वावडे येथे रंगला विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा! 

अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर-माझ्या मतदारसंघात विकास कामे देताना समान न्यायाचे धोरण मी ठेवले असून कोठेही भेदभाव ठेवलेला नाही,मतदारसंघात या अगोदर भूमीपूजन केलेली अनेक कामे आता पूर्णत्वास येत असल्याने लोकार्पण सोहळ्याचे पर्व सुरु झाले असून त्यापाठोपाठ पुन्हां नवीन कामांचा पाठपुरावा देखील सुरूच असल्याने भूमीपूजनही थांबणार नाहीत अशी ग्वाही आ.अनिल भाईदास पाटील यांनी वावडे येथे विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केली.
         आमदार पाटील यांच्या प्रयत्नाने वावडे येथे मुडी लोण रस्त्यावरील पूल बांधकाम,नूतन ग्रामपंचायत कार्यालय आणि संरक्षण भिंत ही महत्वपूर्ण विकास कामे पूर्णत्वास आल्याने आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत   लोकार्पण सोहळ्याचे आयोजन गावात करण्यात आले होते,गावात आगमन होताच आमदारांची जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्री अनिल पाटील, कामगार नेते एल. टी पाटिल, तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटिल, माजी कृ.ऊ.बा.समिती संचालक विश्वास पाटील, तरवाडे सरपंच रामकृष्ण पाटिल, नगरसेविका गायत्री पाटिल, महिला तालुकाध्यक्षा मंदाकिनी भामरे, आत्माकमिटीचे अध्यक्ष सुनील पवार, जवखेड्याचे माजी सरपंच श्याम पाटिल, माजी सभापति डॉ.दीपक पाटील, टाकरखेडे ज्ञानेश्वर पाटिल, लोण माजी सरपंच अंकिता पाटील, गलवाड़े उप सरपंच संदीप पाटिल, आत्माकमिटीचे सदस्य म्हारू पाटिल, वावडे सरपंच उषाबाई पाटिल, सदस्य योगिता पाटिल, पंकज पाटिल, अधिकार पाटिल, वावडे वि.का. सोसायटी चेअरमन चंद्रकांत पाटील, डॉ.चेतन पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, रडावणचे भैय्यासाहेब पाटील, विश्वास पाटील, भगवाण दिलीप पाटिल, विजय पाटिल, शांताराम पाटिल, जयदेव पाटिल, देवदास पाटिल, प्रकाश पाटिल, युवराज पाटिल, भगवान चौधरी, पोलिस पाटील, डॉ.दत्ता ठाकरे यशवंत पाटील, अशोक पाटिल, पंढरीनाथ माळी, भगवान पाटील, भिकन पाटील, अनिल पाटील, शरद पाटील, ग्रामविकास अधिकारी आर.वाय.पाटिल, दुर्योधन धोबी, भिकन पाटिल, कांतिलाल शिंपी व ग्रामस्थ उपस्थित होते.एकूण 219.20 लक्षच्या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण यावेळी करण्यात आले. सूत्रसंचालन दिपक पाटील यांनी केले.

या कामांचे झाले लोकार्पण

        वावडे-लोण रस्त्यावर  04 अंतर्गत पूल बांधकाम करणे - रक्कम रू 87.20 लक्ष,2515 अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधणे रक्कम रु.13 लक्ष,04 अंतर्गत गावाजवळ संरक्षण भिंत बांधणे-रक्कम रु.55 लक्ष

या कामाचे झाले भूमीपूजन

 3054 अंतर्गत- वावडे-मुडी रस्ता डांबरीकरण करणे (वर्क ऑर्डर बाकी)- रक्कम 40.00 लक्ष,पानद रस्ता- वावडे ते मुडी क्षेत्र रस्ता खडीकरण करणे (वर्क ऑर्डर बाकी)- रक्कम रु 24.00 लक्ष

Below Post Ad

#

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या