Type Here to Get Search Results !

Banner

मुंदडा ग्लोबल मध्ये शिक्षकेतर दिवस साजरा

अमळनेर प्रतिनीधी : मुंदडा फाऊंडेशन संचलित श्री एन.टी. मुंदडा ग्लोबल व्हयु स्कुल अमळनेर येथे जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर संघटना , जळगाव व शिक्षणाधिकरी जिल्हा परिषद जळगांव यांचे आदेशान्वये दिनांक १५ नोव्हेंबर हा दिवस आज पासुन प्रति वर्षी शिक्षकेतर दिवस म्हणुन साजरा करण्यात यावा त्यानिमीत्ताने आज रोजी शिक्षकेतर दिवस साजरा करून प्राचार्य श्री लक्षमण सर यांनी विद्यालयाच्या सर्वागीण विकासात शिक्षकेतर कर्मचा - यांचेही सर्वात महत्वाचे स्थान आहे . 

        सदर कर्मचारी यांचे महत्व सांगत सर्व शिक्षकेतर कर्मचा - यांना पुष्प व भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला . व शिक्षकेतर कर्मचारी यांची संगीत खुर्ची स्पर्धाही घेण्यात आली सदर शिक्षकेतर दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकेतर कर्मचा - यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री ओमप्रकाशजी मुंदडा , चेअरपर्सन सौ छायाभाभी मुंदडा , सहसचिव श्री.योगश मुंदडा , सचिव श्री अमेय मुंदडा , अॅडमिनीस्ट्रेटर सौ . दिपीका अमेय मुंदडा , श्री . नरेंद्र मुंदडा , श्री राकेश मुंदडा , श्री . पंकज मुंदडा , सर्व पदाधिकारी , शाळेचे प्राचार्य श्री . लक्ष्मण सर , प्रायमरी प्राचार्या सौ . विद्या मॅडम , प्रि – प्रायमरी को - ऑडीनेटर सौ . योजना ठक्कर यांनी कौतुक केले , व शिक्षकेतर दिनाच्या शुभेच्छा दिल्या .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या