पाचोरा: आपल्या दिव्यांग क्षेत्रात निस्वार्थ कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थी संघ संचलित, मूकबधिर निवासी विद्यालयात आज दि. 26 जानेवारी 2025 रविवार रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाचा कार्यक्रम मा. श्री. नितीनजी रंगनाथ देव (बांधकाम व्यावसायिक,आळंदी- पुणे) यांचे शुभहस्ते संपन्न झाला. सदर राष्ट्रीय कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक- श्री. अतुल महाजन सर, श्री. भगवान पाटील सर, श्री. छोटू सोनवणे सर, ग्रामस्थ बंधू, माता भगिनी, पत्रकार श्री. दीपक मुलमुले, श्री. राजू ठाकूर, श्री. चंद्रकांत माहोर , संस्थेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष तथा अध्यक्ष ग्रामविकास मंडळ पिंपळगाव (हरे.) , मा. श्री. पी.बी. पाटील साहेब, तसेच संस्थेचे पदाधिकारी श्री. एस.एस. पाटील सर, श्री. संजय पाटील सर, श्री. विठ्ठल बडगुजर सर, श्री रुपेश बडगुजर सर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ईश्वर पाटील सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद हजर होते, याप्रसंगी श्री. नितीन पाटील सर यांनी कवायतीचे संचलन केले, कर्णबधिर विद्यार्थ्यांनी कवायतीचे विविध प्रकार सादर करून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली.
उपस्थित मान्यवरांचे आभार श्री गोविंद महाजन सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या