अमळनेर: लोकमान्य शिक्षण मंडळ संचलित लोकमान्य विद्यालयात आज दि. २६ जानेवारी २०२५ रविवार रोजी ७६ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजवंदनाचा कार्यक्रम मा.मच्छिंद्र मोरे मुख्याध्यापक नवीन मराठी शाळा यांचे शुभहस्ते संपन्न झाला. सदर राष्ट्रीय कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.धर्मसिंह धनसिंह पाटील, चिटणीस विवेकानंद लक्ष्मण भांडारकर, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.प्रभाकर जगन्नाथ जोशी, नवीन मराठी शाळेचे चेअरमन प्रा.आर.पी नवसारीकर, कार्यकारी संचालक राजेंद्र खाडिलकर आदी पदाधिकाऱ्यांसह बाल विकास मंदिर, नवीन मराठी शाळा व लोकमान्य विद्यालय या तिनही शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या