यंदा ट्रॅक्टरने रथ ओढल्याने महिला, वृद्ध, बालकांना रथाचे निवांत दर्शन घेता आलेअमळनेर : संत सखाराम महाराजांच्या जयघोषात मोहिनी एकादशीला रथोत्सवाला विधिवत पूजा करून रात्री ८ वाजता सुरुवात झाली. यंदा पासून रथ ट्रॅक्टर ने ओढायला सुरुवात झाल्याने भाविकांना निवांतपणे रथाला स्पर्श करून दर्शन घेता आले आणि प्रदक्षिणाही घालता आली. सायंकाळी प्रसाद महाराजांच्या हस्ते विठ्ठल रुख्मिनी मंदिरात पूजा व आरती करण्यात आली. यावेळी ईश्वरदास महाराज, नंदगावकर , भक्तराज महाराज मुल्हेरकर, खासदार स्मिता वाघ, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, भैरवी पलांडे, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, डीवायएसपी विनायक कोते, परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक मंगला पवार मुख्याधिकारी तुषार नेरकर, अभियंता डिगंबर वाघ, अभियंता सुनील पाटील, नायबतहसीलदार कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, डॉ अनिल शिंदे, विषवस्त ऍड रवींद्र देशमुख, दिलीप देशमुख, डॉ डिगंबर महाले, राजश्री पाटील हजर होते. विश्वस्तानी लालजींची मूर्ती मंदिराबाहेर आणली. अभय देव व आरती देव या दाम्पत्याने रथाची पूजा केली. व लालजींची मूर्ती रथावर स्थानापन्न केली. अनिष वैद्य, अथर्व वैद्य यांनी चांदीच्या मशाली धरल्या होत्या.
सुरुवातीला परंपरेप्रमाणे मुस्लिम बांधवाकडून मानाची मोगरी लावण्यात आली. भक्तांनी दोराने रथ ओढण्यात आला. नंतर ट्रॅक्टर लावण्यात आले. रथाच्या जवळ पोलीस कर्मचाऱ्यांनी कडे केल्याने सुरक्षा कडक होती. लहान मुले, वृद्ध, महिलांना सुरळीत दर्शन घेता आले. रथाच्या मागे चांदीचा रथ पादुका असलेला होता. त्यामागे प्रसाद महाराज अनवाणी चालत होते. रथाच्या पुढे वाजंत्री, घोडेस्वार, भालदार चोपदार चालत होते.
रथ मिरवणूकित अनिल जोशी, केतन जोशी, उदय देशपांडे, महेश कोठावदे, निलेश भांडारकर, प्रवीण पाठक, गोपी कासार, शीतल देशमुख, प्रीतपालसिंग बग्गा, मनोज भांडारकर यांच्यासह अनेक सेवक हजर होते. वाजत गाजत सराफ बाजारातून दगडी दरवाजा मार्गे फरशी रोड मार्गे बोरी नदीच्या पुलावर रथ आल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी व रोषणाई करण्यात आली. यात्रेत नांदेड जिल्ह्यातील भोकरदन येथील दोन महिला इतर महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावत असताना हेडकॉन्स्टेबल मिलिंद भामरे, विनोद संदानशीव, उज्वल म्हस्के यांनी त्या महिलांना पकडून पोलीस स्टेशनला जमा केले.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या