Type Here to Get Search Results !

Banner

मारवड हायस्कूल मध्ये स्नेह संमेलन संपन्न!


अमळनेर प्रतिनिधी: मुंदडे हायस्कूल मारवड येथे 28 ऑक्टोबर 2022 रोजी सन 1994 वर्षी इयत्ता दहावीतील विद्यार्थी विद्यार्थिनी व माजी शिक्षकांचे स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी प्राचार्य शांताराम पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून एस एम पाटील सर, बी एस पाटील सर, जी. बी. शिंदे सर, अशोक सुर्वे सर, हरिभाऊ मारवडकर सर, जे एस पाटील सर, ए डी पाटील डी जी पाटील सर, बी बी सोनवणे सर आजी-माजी 40 शिक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. 

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन साळुंखे सर व रेखा मराठी मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा पवार व करुणा गरुड   यांनी केले विद्यार्थ्यांमधून प्राध्यापक अशोक पाटील सर व मीना पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर स्नेहसंमेलनासाठी पुणे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, मुंबई, गुजरात या ठिकाणाहून जवळपास 75 विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होत्या. मारवड हायस्कूलच्या इतिहासात प्रथमच असे स्नेहसंमेलन झाल्याने सर्व आजी-माजी शिक्षक विद्यार्थ्यांना खूपच आनंद झाला. शेवटी आभार प्रदर्शन राजेश सैदाणे सरांनी केले व कार्यक्रमाच्या शेवट राष्ट्रगीताने झाला , कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक पाटील , सतीश पाटील आदींनी मदत केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या