Type Here to Get Search Results !

Banner

सौ.स्नेहल योगेश ठाकूर सावित्री ज्योती सन्मान २०२२ पुरस्काराने सन्मानित!


जळगाव: शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल  अभिनव प्राथमिक विद्यालय सरावपाठशाळा जळगाव येथील उपशिक्षिका स्नेहल प्रकाश ठाकूर यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक कामाची व  उपक्रमांची दखल घेत नाशिक येथे निर्वाण फाउंडेशनच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. निर्वाण फाउंडेशन आयोजित सावित्री ज्योती सन्मान २०२२ वितरण सोहळ्यात नाशिक येथे रोटरी कम्युनिटी सभागृहात स्नेहल ठाकूर यांना सावित्री ज्योती सन्मान २०२२ ने अभिनेता प्रशांत गरुड डॉ.अरबीस्ता दत्ता  डॉ.गॅब्रियल लोपेस दा सिल्बा, डॉ. एम बी देशमुख (जिल्हा क्षयरोग अधिकारी नाशिक) अभिनेत्री पल्लवी पटवर्धन व संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या हस्ते मानाचा फेटा, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
सन २०२१ ला देखील 'उपक्रमशील शिक्षिका' म्हणून त्यांना खान्देश नारी शक्ती फाउंडेशन, खान्देश जनसेवा फाउंडेशन, इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन आणि नारीशक्ती ग्रुप जळगाव यांचे तर्फे 'राज्यस्तरीय नारीदिप' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यापूर्वी २०२० या वर्षात देखील त्यांना शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या वतीने कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि समाज प्रबोधनासाठी केलेल्या ऑनलाईन उपक्रमांसाठी 'आदर्श ई- शिक्षक पुरस्कार' देखील प्राप्त झालेला आहे. 
सलग तीन वर्ष त्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करून हॅट्रिक केली आहे. या पुरस्काराचे खरे मानकरी माझे विद्यार्थी, कुटुंबीय आणि मला प्रोत्साहन देणाऱ्या सर्व व्यक्तींना मी समर्पित करते असे सौ. स्नेहल योगेश ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले. याबद्दल शिक्षण मंदिर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एस.डी.चौधरी सर तसेच अध्यापिका विद्यालयाच्या माननीय प्राचार्य सौ.सुवर्णा चौधरी मॅडम यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन व कौतुक केले तसेच सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या