Type Here to Get Search Results !

Banner

शैक्षणिक संशोधनातून विद्यार्थीहित जोपासणारे स्काउटमास्टर : श्री.सुरेश सिताराम अहिरे


अमळनेरः शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक, राजकीय क्षेत्राशी निकटचा संबंध येत असतो,या सामाजिक सेतूचा उत्तम उपयोग करत
विद्यार्थीहित जोपासणारे शिक्षक हे सदैव प्रेरणादायी ठरतात अशा मान्यवर शिक्षकांच्या रांगेतील मानाचे स्थान असलेले शैक्षणिक संशोधनातून विद्यार्थीहित जोपासणारे, विधायक उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जोपासणारे  जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील नेहरु विद्या मंदिराचे पर्यवेक्षक श्री.सुरेश सिताराम अहिरे यांची शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल पथदर्शी ठरली आहे.
-----------------------------
पदांचे मानकरी :
------------------------------
शिक्षक नेते : शिक्षक परिषद,जळगाव
तज्ञसंचालक : माध्य.शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी भुसावळ
उपाध्यक्ष : शिक्षक परिषद जळगाव
उपाध्यक्ष : इंडियन बहूजन टिचर्स असो. जळगाव.
संचालक : महर्षी व्यास माध्य.विद्यालय वेल्हाळे.
सदस्य : महाराष्ट्र राज्य चर्मकार समाज संस्था पातोंडे.
संघटक : अखिल भारतीय ग्राहक पंचायत भुसावळ.
मा. अध्यक्ष : शिक्षक परिषद भुसावळ.
सचिव : केंद्रिय मानवाधिकार सलंग्न उ. म. विभाग.  
जिल्हा सल्लागार :  केंद्रिय मानवाधिकारी संघटना जळगाव.                              
जिल्हा संघटक निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जळगाव

कार्यवाटचालीतील ठळक बाबी :
--------------------------------
नवोपक्रम स्पर्धा माध्य.विभाग -  प्रथम क्रमांक जळगाव 2005.
विज्ञान प्रदर्शन तालुका ,जिल्हा - प्रथम क्रमांक 2005,2006.
ट्रेनिंग कौन्सीलर्स - भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्था जळगाव 2012-2013 , 2013-2014 , 2014-2015.
41 वे राज्य विज्ञान प्रदर्शन बारामती - जिल्हा विज्ञान प्रतिनिधी 2016..

पुरस्कारांचे मानकरी :
-----------------------------
डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षक पुरस्कार भुसावळ 1999
जि. प. आदर्श शिक्षक पुरस्कार जळगाव 2000
कास्ट्राईब आदर्श शिक्षक पुरस्कार जळगाव 2000 .
कै. शामराव पाटील राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार लातूर 2002
आदर्श शिक्षक पुरस्कार इंदौर 2005  
डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप दिल्ली 2005
मा. फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ( इल्टा संघटना ) पूणे 2007
म.ज्योतीराव फुले गुरु गौरव पुरस्कार धुळे 2010
आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार भुसावळ 2014
उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार वेल्हाळे 2015
लोकसत्ता संघर्ष राज्यस्तरीय पुरस्कार अहमदनगर 2017
प्रशासुर्य गुणवंत शिक्षक पुरस्कार , भुसावळ 2019
गुरुरत्न पुरस्कार,वरणगाव 2020
समाज गौरव पुरस्कार,नवी दिल्ली 2020
आय टी स्कीलस फॉर टिचर अवार्ड रोटरी 3132,3030
कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार,शिक्षक ध्येय,नाशिक 2020
--------------------------------
ऊत्तम परीक्षक :
श्री अहिरे यांनी राष्ट्रपती अवार्ड टेस्टींग कम्प , स्काऊट , पुष्करघाटी , राजस्थान,एस.एस.सी विज्ञान व तंत्रज्ञान पूणे , नाशिक . स्काऊट गाईड जिल्हा मेळावा कानळदा,नशिराबाद जि.जळगाव,तालुका व जिल्हा विज्ञान प्रदर्शन वरणगाव , भुसावळ, शिरसोली जि .जळगाव .स्काऊट गाईड संघनायक प्रशिक्षक वरणगाव ता भुसावळ,स्काऊट ऑफीस जळगाव,शिक्षण विभाग भुसावळ व अंतर्नाद प्रतिष्ठानच्या शिवजयंती स्पर्धा भुसावळ आदी शिबीर आणि स्पर्धांचे यशस्वीरीत्या परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

पथदर्शी वाटचाल :
विज्ञानाची विशेष रुची असलेल्या श्री अहिरे यांना  विज्ञान व तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी लावलेले विविध शोध त्यांच्या जीवनाविषयी माहिती विज्ञान सभेमध्ये देणे,विज्ञान प्रदर्शन,तालुका,जिल्हा पातळीवर सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आदीं कार्यांची विशेष आवड आहे श्री अहिरे यांचे मार्गदर्शन प्राप्त अनेक विद्यार्थी सामाजिक,सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत विज्ञान प्रदर्शनात प्रत्यक्ष स्वत:सहभाग घेवून लोकसंख्या शिक्षण,एडस् जनजागृती,चार्टस् मॉडेल्स तयार करून  तालुका व जिल्हा पातळीवर विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक व सहभागी प्रमाणपत्र श्री अहिरे यांनी प्राप्त केले आहे तसेच तालुका विज्ञान प्रदर्शनात सातत्याने परिक्षक म्हणून ते काम करीत आहेत.

स्काऊट मास्टर म्हणून उल्लेखनीय कार्य  :
मुलांना शाळेतील चार भिंतीपेक्षा मोकळ्या वातावरणात खेळाच्या माध्यमातून कृतीतून दिले जाणारे शिक्षण हे जास्त आवडते .स्काऊटचे नियम,वचन या विषयीची निष्ठा बाळगून त्यांचे पालन करणे करण्यास प्रवृत्त करणे हे ध्येय व शिक्षण स्काऊट शिबीरांच्या माध्यमातून श्री अहिरे देत असतात ११ विद्यार्थी स्काऊट राज्यपुरस्कार प्राप्त झालेले आहेत. संघनायक प्रशिक्षण वर्गाना भेटी देऊन मार्गदर्शन करत जिल्हा पातळीवर राज्य पुरस्काररासाठी  उत्तम स्काऊटस करणे तालुका व जिल्हामेळाव्यात मार्गदर्शन व परिक्षक म्हणून तर राष्ट्रपती अवार्ड टेस्टींग कॅप पुष्कर घाटी अजमेर येथे परिक्षक म्हणून श्री अहिरे यांनी काम पाहिले आहे.

विधायक उपक्रमाचे आयोजन :
श्री अहिरे यांच्या मार्गदर्शनात १ डिसेंबर रोजी  एडस् जागृती दिनानिमित्ताने शाळेमध्ये इ ९ वी,१० वी च्या विद्यार्थ्यांकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र ,पिंपळगांव बु येथे तज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करून मुला -मुलींच्या आरोग्याची तपासणी केली जाते.शालेय स्तरावर एडस् पोस्टर्स तयार केले जातात .चित्रकला स्पर्धा आयोजित करून प्रथम,व्दितीय,तृतीय क्रमांक उत्कृष्ट चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येते.

शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शन :
विद्यार्थ्यांना शिक्षणक्रम आणि व्यवसाय निवडण्याची पूर्व तयारी माध्यमिक शाळांत असतांना करावी लागते .श्री अहिरे मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांच्या
संपूर्ण समस्या सोडवून त्यांचे निराकरण करतात विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती पुरवून निर्णय घेण्यास निर्णयक्षम केले जाते .समस्येच्या विविध बाबतीत विचार करून विद्यार्थी स्वयंनिर्णय घेत असतात वर्तमान पेपर मधील जाहिरातीचे कात्रण कापून सूचना फलकावर लावले जातात परिसरातील पोलिस उपनिरीक्षक ,तज्ञ शिक्षक व्यवसाय तांत्रिक प्राचार्य,डॉक्टर यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्राविषयी मार्गदर्शन करण्याचा श्री अहिरे यांचा प्रयत्न असतो

शैक्षणिक संशोधन :
सुरुवातीपासून श्री अहिरे यांनी  शिक्षण क्षेत्रात संशोधनात्मक प्रवृत्ती जोपासत तिचा  विकास केला आहे .
१ ) एम . ए . २ ) एम.एड.अभ्यास इ .८ वीच्या विद्यार्थ्याचा गणितीय अध्ययनात शैक्षणिक साधनांची निर्मिती .इ .९ वी विज्ञान भाग -२ या विषयाचे प्रयोग करतांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास  ३ ) डी.एस. एम . इ . १० वी च्या विद्यार्थ्यांना रासायनिक समिकरणे लिहीतांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास
४) नवोपक्रम गणितीय अध्ययनावर साधन निर्मिती विस्तार सेवा केंद्र ,जळगांव  ५) पुणे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे ३ येथे इ .९ वी च्या विद्यार्थ्यांना रासायनिक समिकरणे लिहीतांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास  आदी महत्वपूर्ण बाबींवर श्री अहिरे यांनी शैक्षणिक संशोधन केले आहे

शिक्षक प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका :
श्री अहिरे यांनी आतापर्यंत शिक्षक प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे यामध्ये  १२ वर्ष पूर्ण झालेल्या माध्यमिक शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कामकाज,२४ वर्ष पूर्ण झालेल्या माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ट वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून कामकाज ,स्काउट बेसिक व प्रगत प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक,व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षणासाठी तालुका व जिल्हा पातळीवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कामकाज, गुणदान ऐवजी श्रेणीदान तालुका पातळीवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कामकाज, इ . १० वी विज्ञान व तंत्रज्ञान तालुका पातळीवर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कामकाज,शाळा व संस्था विकासासाठी केलेले कार्य, संस्थेच्या निवडणूक कार्यात निवडणूक मदतनीस म्हणून कामकाज,ग्रामिण विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी सातत्याने व्यवसाय मार्गदर्शन,एस.एस.सी. परिक्षेचा निकाल उंचावण्यासाठी परीसरातील विविध शाळेमधील वेगवेगळ्या विषयातील तज्ञ शिक्षकांना आमंत्रित करून मार्गदर्शक म्हणून कामकाज,स्काऊट गाईड भुसावळ , बोदवड , मुक्ताईनगर या तिन्ही तालुक्यामधील स्काऊट गाईड शिक्षकांना प्रगतीपट कसा भरावा श्रेणी कशी द्यावी .या विषयी मार्गदर्शक म्हणून यशस्वीरित्या कामकाज पाहिले आहे

राष्ट्रीय ऐक्य वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न
राष्ट्रीय ऐक्य वाढीसाठी  श्री अहिरे यांनी ५ वर्षाच्या आतील बालकांना स्काऊट गाईड त्यांच्या मदतीने पल्स पोलिओं केंद्रावर ने आण करणे,त्याविषयी प्रभात फेरी काढून जनजागृती करणे, राष्ट्रीय वनश्री संगोपन संस्थेत कामकाज ,आपदग्रस्तांसाठीच्या  मदत रॅलीत सहभाग घेणे, एडस् कॅन्सर इत्यादी रोगांच्या दुष्परीणामांबद्दल सामाजिक प्रबोधन प्रभातफेरीच्या माध्यमातून जनजागृती , छोटे कुटूंब सुखी कुटूंब माहिती व जनजागृती करण्याचे सामाजिक कार्य केले आहे.

सामाजिक बांधिलकीची जोपासना :
चर्मकार जागा हो , देशाचा धागा हो , समाजामध्ये जनजागृती, अनु . जाती , जमाती मुला - मुलींना वह्या पुस्तके व प्राथमिक शाळेत २ मुले व २ मुली यांना  ड्रेस देवून मदत, ग्रामिण भागात राहणारे अनु . जाती व जमातीतील पुरुष व माहिला यांना छोटे कुटूंबासंबंधी मार्गदर्शन, डॉ . आंबेडकर , महात्मा फूले , शिवाजी महाराज , महात्मा गांधी आदि मान्यवर महापुरुषांच्या जयंती महोत्सवात  सहभाग ,अनु . जाती , जमातीतील पुरुषांना व्यसनमुक्ती करण्यासाठी माहिती देणे या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad

#

Naveparv Paid Ad

#

ताज्या बातम्या